PM Narendra Modi
PM Narendra Modi esakal
देश

Ferozepur Rally : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान मोदींचा ताफा 15 मिनिटं उड्डाणपुलावर थांबला होता.

पंजाबमधील (Punjab) फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) आगमनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. कार्यक्रमाच्या ठिकाणी सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं हा निर्णय घेण्यात आला. पीएम मोदी फिरोजपूर येथील रॅलीच्या ठिकाणी 42,750 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार होते. मात्र, पायाभरणीचा कार्यक्रम कसा पार पडणार आहे, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठं बळ पंजाब-हरियाणातून मिळालं होतं. अखेर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर होते. बुधवारी पंजाबच्या फिरोजपूर इथं त्यांची रॅली होती. मात्र, ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. सुरुवातीला रॅली रद्द होण्यामागे पावसाचं कारण देण्यात आले. परंतु, आता रॅली रद्द होण्यामागे सुरक्षेचं कारण देण्यात आलंय.

सुरक्षेच्या कारणास्तव पीएम मोदींची फिरोजपूर रॅली रद्द (Ferozepur Rally Canceled) करण्यात आलीय. गृह मंत्रालयानं (Ministry of Home Affairs) एक निवेदन जारी करून म्हटलंय, की पंजाब सरकारकडून अहवाल मागवण्यात आलाय. दौऱ्याची सविस्तर पूर्व माहिती असतानाही अशी चूक होणं गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा ताफा 15 मिनिटं उड्डाणपुलावर थांबला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT