Rahul Gandhi On Reservation says will remove 50 percent cap on reservation if india alliance in power watch Video  
देश

Rahul Gandhi On Reservation : ...तर आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार! राहुल गांधींची मोठी घोषणा

Rahul Gandhi On Reservation : इंडिया आघाडी जर केंद्रात सत्तेत आली तर आम्ही आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकू अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे

रोहित कणसे

Rahul Gandhi On Reservation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे, त्यांनी सोमवारी रांची येथे बोलताना केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास देशातील जातीनिहाय जनगणना केली जाईल आणि आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल अशी घोषणा केली आहे.

रांची येथील शहीद मैदानावर झाल्याल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आयोजित रॅलीला संबंधित करताना राहुल गांधी यांनी हे आश्वासन दिलं आहे. राहुल गांधी यांनी यावेळी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका देखील केली.

माजी काँग्रेस अध्यक्ष राहिल गांधी म्हणाले की जाती जनगणना करण्याची मागणी होत आहे आणि ओबीसी, दलित आणि आदिवासींना अधिकार देण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान म्हणतात की कोणतीही जात अस्तित्वात नाही, मात्र जेव्हा मतं मागण्याची वेळ येते तेव्हा पंतप्रधान म्हणतात की ते ओबीसी आहेत.

नरेन्द्र मोदी म्हणतात की ते ओबीसी आहेत, परंतु जेव्हा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली की ते सांगतात की फक्त दोन जात आहेत- गरीब आणि श्रीमंत, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या सभेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी म्हणातात की, आजकाल ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण मिळू शकत नाही. हे पन्नास टक्क्यांच लिमीट काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं सरकार काढून फेकून देईल असे राहुल गांधी म्हणाले.

जे दलित, आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणात कुठलीही कमतरता येणार नाही, याची मी गॅरंटी देतो, मागास घटकांना त्यांचा अधिकार मिळेल, असेही राहुल गांधी म्हणाले. हा देशातील सर्वात मोठा प्रश्न आहे. दलित, आदिवासी यांना बॉडिंग लेबर बनवलं जात आहे. मोठ्या कंपन्यात, रुग्णालयात, कोर्टामध्ये, शाळा महाविद्यालयात यांची कुठलीच भागिदारी नाहीये असेही राहुल गांधी म्हणाले. आमचं पहिलं पाऊल जातनिहाय जनगणना करणे हे असेल असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT