Rahul Gandhi and Narendra Modi 
देश

Rahul Gandhi: मोदींचं भाषण सुरू होण्याआधीच राहुल गांधींनी सोडली संसद, १ तासाने आले परत.. जाणून घ्या कारण

केंद्र सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर संसदेत तीन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. गुरुवारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर बोलणार होते.

सकाळ डिजिटल टीम

No Confidence Motion:

नवी दिल्ली- केंद्र सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर संसदेत तीन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. गुरुवारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर बोलणार होते. त्यामुळे सर्व देशाचं लक्ष त्याकडे लागलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील मोदींचे भाषण ऐकण्यासाठी ठीक चार वाजता संसदेत आले होते. पण, जेव्हा प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरु झाले, तेव्हा राहुल गांधी संसद सोडून गेल्याचे समोर आले. त्यामुळे राहुल संसदेत मोदींचे भाषण ऐकण्यासाठी संसदेत का थांबले नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

माहितीनुसार, पंतप्रधान मोदी चार वाजता अविश्वास प्रस्तावावर बोलणार होते. त्यामुळे राहुल गांधी ठीक चार वाजता सभागृहात आले. पण, पंतप्रधान मोदी यांनी पाच वाजता सभागृहात आपले संबोधन सुरु केले. राहुल गांधी चार वाजल्यापासून मोदींच्या भाषणाची वाट पाहत होते. पण, पाचनंतर त्यांची नियोजित मिटिंग होती त्यामुळे ते सभागृह सोडून निघून गेले. माहितीनुसार, राहुल गांधी पुन्हा संसदेत परत आले आहेत. राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली होती.त्यामुळे मोदी यावर काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारला 12 वर्षे पूर्ण होताच दिल्लीत घडामोडींना वेग! महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडण्याची संधी; 'या' 3 मोठ्या पक्षांचे खासदार फोडून भाजप बहुमत गाठणार?

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव कोसळले! 70 दिवसांतील सर्वात स्वस्त दर; सोनं 1.36 लाखांवर? पाहा महाराष्ट्रातील ताजे भाव

साखरपुड्याला जाताना अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह ६ जणांचा मृत्यू, कारचा पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर

Buldhana: खरीपाच्या उंबरठ्यावर बळीराजा समोर संकटांचा डोंगर;पावसाची अनिश्चितताः महागाईचा फटका आणि वाढत्या खर्चाने शेतकरी हवालदिल

Pune News: जागा हस्तांतरित होण्यापूर्वीच १,५०० झाडांवर कुऱ्हाड?; मुंढवा बॉटनिकल गार्डन प्रकरण गाजले, प्रशासनाला एवढी कसली घाई..

SCROLL FOR NEXT