crime esakal
देश

Rajasthan Crime : धक्कादायक! राजस्थानमध्ये महिलेला केलं विवस्त्र; घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

Rajasthan Crime : गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशाल हादरवणारा व्हिडिओ मणिपूर मधून समोर आल्याचे पाहायला मिळाले होते. दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्यात आल्याची ती घटना होती. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मात्र आता एका आदिवासी महिलेला तिच्या पतीने गावकऱ्यासमोर विवस्त्र केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी एका आदिवासी महिलेला तिच्या पतीने गावकऱ्यांसमोर विवस्त्र केले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संपूर्ण मानवतेला लाज वाटेल अशी घटना राजस्थान मध्ये प्रतापगड जिल्ह्यात घडली आहे. पीडित महिलेचे वय 21 असून तिला तिच्या सासरच्यांनी जबरदस्तीने गावी नेले. मात्र तिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध होते. ती त्याच्या सोबत राहत होती. यामुळे सासरच्या मंडळींना राग आला. महिलेच्या पतीने गुरुवारी गावकऱ्यांसमोरच तिला विवस्त्र केले. याचा व्हिडिओ शुक्रवारी समोर आला.

व्हिडिओमध्ये महिला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असून ती किंचाळत आहे. मात्र गावकरी बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. नवरा महिलेचे कपडे फाडतोय, गावकऱ्यांसमोर स्वतःच्या पत्नीला विवस्त्र करतोय असे दृश तिथे उपस्थित लोकांनी टिपले आहे. यात सर्वात वाईट बाब म्हणजे, महिलेला वाचवण्यासाठी गावातील कोणीही पुढे आले नाहीत. गावकरी या घटनेचा व्हिडिओ बनवत असल्याचे पाहायला मिळाले.

आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेसाठी सहा पथके तयार करण्यात आले आहेत. अशी माहिती एसीपी अमित कुमार यांनी दिली. एसीपी अमित कुमार यांनी गावात तळ ठोकला आहे

याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी ट्विट केले आहे. प्रतापगड जिल्ह्यात एका वादावरून महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विवस्त्र केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुसंस्कृत समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नाही. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात येणार असून लवकरात लवकर शिक्षा होईल असे यावेळी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT