Amit Shaha sakal
देश

Rajastan Election: सरकारने ४० लाख युवकांना धोका दिला; अमित शहांचा गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

Rajastan Election: ‘‘नोकरीचे आमिष दाखवून राजस्थान सरकारने ४० लाख युवकांना धोका दिला आहे’’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला. राजस्थानमधील अलवार येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेमध्ये बोलत होते.यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर जोरदार टीका केली. शहा म्हणाले, ‘‘राजस्थानमध्ये प्रत्येक परीक्षेचे पेपर फुटत होते.

या पेपरफुटी प्रकारात काँग्रेसचे नेतेही सामील झाले आहेत. या प्रकारामुळे राजस्थानातील ४० लाख युवकांना रोजगारापासून वंचित राहावे लागले. यासाठी गहलोत सरकार जबाबदार आहे.राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल.’’ पेपरफुटी प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तींना पोलिस कोठडीत पाठविण्यात येईल, असा दावाही केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी केला. राजस्थानमध्ये महिलांवर अत्याचार वाढले आहेत.

त्याचप्रमाणे काँग्रेसमधील नेते एकमेकांना पाण्यात पाहत असून काँग्रेसच्या काळात राजस्थान विकासात मागे पडला आहे असा आरोपही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी अपशब्द बोलत आहेत, याबद्दल काँग्रेस पक्षाने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ‘एपस्टीन’चा वापर करून सहीसाठी दबाव; भारत-अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

Kolhapur Cleaning Cmpaign : दोन बोटींतून नदीतील कचरा बाहेर; आपदा मित्रांच्या धडाकेबाज कामगिरीने बदलला घाटाचा चेहरा

Igatpuri School Accident : इगतपुरीत Little Blossom शाळेच्या आवारात शिक्षकाने विद्यार्थ्याच्या अंगावर घातली कार; CCTV फुटेज पाहिल्यावर पालकांचा संताप

Kolhapur Cleaning Cmpaign : अवघ्या अडीच तासांत दोन टन कचरा हटवला; पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा झळाळून निघाला!

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्त; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

SCROLL FOR NEXT