देश

लडाखमध्ये चीनची घुसखोरी; राजनाथ सिंह

पीटीआय

नवी दिल्ली - पूर्व लडाख भागात मोठ्या संख्येने चिनी सैन्य घुसले असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कबूल केले. ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. चिनी सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी केल्याचे सरकारने प्रथमच मान्य केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारत-चीन सीमावादाबाबत माहिती देताना राजनाथ सिंह म्हणाले की, दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान सहा जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत लडाखबाबत चर्चा होणार आहे. हा भाग आपलाच असल्याचा चीनचा दावा आहे. त्यामुळे चीनच्या सैनिकांनी मोठ्या संख्येने येथे घुसखोरी केली असून भारताला त्याबाबत जी पावले उचलायची होती, ती उचलण्यात आली आहेत. चीनबरोबरील वादाबाबत केंद्राने वास्तव परिस्थिती सांगावी आणि जनतेच्या मनांतील शंका दूर कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने गेल्या आठवड्यात केली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या महिन्यापासून उत्तर सिक्कीम आणि पूर्व लडाख भागांत चिनी सैन्याच्या घुसखोरीवरून दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे झाले आहेत. भारत आणि चीनमध्ये हजारो किलोमीटर लांबीची अद्यापही आखणी न झालेली सीमारेषा आहे. ही प्रत्यक्ष ताबा रेषा असून त्याच्या निश्चितीवरून दोघांमध्ये वाद आहेत. 

डोकलाम वाद चर्चेतून सोडविण्यात आला होता. आतासारखी परिस्थिती आधीही निर्माण होऊन त्यातून मार्ग निघाला होता. आताही राजनैतिक आणि लष्करी पातळीवरून चर्चा सुरू आहे. आम्ही कोणत्याही देशाच्या स्वायत्ततेला धक्का लावणार नाही, पण आमचाही अभिमान गहाण ठेवणार नाही. 
- राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT