Ram Mandir Ayodhya esakal
देश

Ram Mandir Ayodhya: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी गर्भगृहात केवळ 'या' पाच लोकांना मिळणार प्रवेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्य सचिव गृह संजय प्रसाद हे देखील योगी यांच्यासोबत होते. योगी आदित्यनाथ यांचा ताफा हनुमानगढी रामजन्मभूमीकडे रवाना झाला आहे.

Sandip Kapde

Ram Mandir Ayodhya: अयोध्येत श्रीराम मंदिर उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येत मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे. २२ जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. या भव्य कार्यक्रमावेळी गर्भगृहात फक्त ५ व्यक्ती हजर राहणार आहेत.

आज तकने दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठेच्यावेळी गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदिबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघप्रमुख मोहन भागवत आणि मंदिराचे प्रमुख आचार्य उपस्थित राहतील.

दरम्यान मंदिरातील मुर्तीच्या निवडीसंदर्भात आज विश्वस्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वाच्या बैठकीत नृपेंद्र मिश्रा, चंपत राय, वासुदेवानंद सरस्वती, स्वामी परमानंद, अयोध्याचे राजा विमलेंद्र मोहन मिश्रा आणि महंत जिनेंद्र दास उपस्थित होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्य सचिव गृह संजय प्रसाद हे देखील मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत होते.  योगी आदित्यनाथ यांचा ताफा हनुमानगढी रामजन्मभूमीकडे रवाना झाला आहे. ते राम मंदिराच्या उभारणीचीही पाहणी करणार आहेत. रामजन्मभूमी येथील भक्तिमार्गाचीही ते पाहणी करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री योगी अयोध्या विमानतळ आणि रेल्वे स्टेशन सार्वजनिक सभेच्या ठिकाणाचीही पाहणी करतील.

प्राणप्रतिष्ठा सोहळा ७ दिवस चालणार आहे. १६ जानेवारीपासून या सोहळ्याला सुरुवात होईल. १६ जानेवारीला विष्णूपूजा आणि गाय दान होईल. यानंतर १७ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची शहरात मिरवणूक काढण्यात येतील. तर १८ जानेवारीला गणेशाची पूजा केली जाणार आहे. यासोबतच वरुण देवपूजा आणि वास्तुपूजाही होणार आहे. (Latest Marathi News)

१९ जानेवारी रोजी हवन अग्नि प्रज्वलित करून हवन करण्यात येणार आहे. २०मजानेवारीला वास्तुपूजा होणार आहे. २१ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीला पवित्र नद्यांच्या पवित्र पाण्याने स्नान घालण्यात येणार आहे. तर २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT