Narendra Modi  esakal
देश

PM Modi : वर्षाअखेरीस अयोध्येत मोदींच्या कार्यक्रमांची रेलचेल; विमानतळाचं उद्घाटन अन् रोड शो...

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्‌घाटनाची जोरदार तयारी सुरू असून त्यापूर्वी ३० डिसेंबरला येथील विमानतळाचेही उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्‌घाटनाची जोरदार तयारी सुरू असून त्यापूर्वी ३० डिसेंबरला येथील विमानतळाचेही उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळाचे उद्‌घाटन झाल्यानंतर मोदी अयोध्येत रोड शो घेणार असून नंतर एक सभाही घेणार आहेत.

राम मंदिराचे उद्‌घाटन पुढील वर्षी २२ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी अयोध्येचाही कायापालट करण्यात आला आहे. अयोध्येत नवीन विमानतळ उभारण्यात आले असून रेल्वेस्थानकाचाही पुनर्विकास करण्यात आला आहे.

मोदी हे ३० डिसेंबरला अयोध्येत येणार असून यावेळी ते विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांचे उद्‌घाटन करतील. विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांच्यातील अंतर १५ किलोमीटरचे आहे. विमानतळावरील कार्यक्रम झाल्यावर पंतप्रधान मोदी याच मार्गावरून रोड शो करत रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती अयोध्येचे जिल्हा न्यायदंडाधिकारी नितीशकुमार यांनी सांगितले.

रोड शोच्या मार्गावर विविध ५१ ठिकाणी मंडप उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी विविध साधूसंत पंतप्रधानांना आशीर्वाद देतील. रेल्वे स्थानक ते विमानतळ या मार्गावरील पाच किलोमीटरच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होईल.

रेल्वे स्थानकावर मोदींच्या हस्ते वंदे भारत आणि अमृत भारत या दोन रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. यानंतर मोदी पुन्हा रस्ते मार्गाने विमानतळावर जाणार असून विमानतळाच्या नजीकच आयोजित केलेल्या सभेत सहभाग घेणार आहेत. अयोध्येसाठीचे पहिले विमान दिल्लीहून सकाळी दहा वाजता उड्डाण करून अयोध्येत सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

Latest Marathi News Live Update : बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी

PM Kisan Samman Nidhi: दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार का? २४व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT