Uma Bharti 
देश

Ram Mandir Ayodhya: "राम-हनुमान भाजपचे नेते नाहीत, अहंकारातून बाहेर पडा"; उमा भारती असं का म्हणाल्या?

माजी केंद्रीय मंत्री, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री भाजप नेत्या उमा भारती यांनी 22 जानेवारीला अयोध्येत अभिषेक सोहळ्यात विरोधी पक्षनेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींच्या सहभागाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

Sandip Kapde

Ram Mandir Ayodhya: माजी केंद्रीय मंत्री, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री भाजप नेत्या उमा भारती यांनी 22 जानेवारीला अयोध्येत अभिषेक सोहळ्यात विरोधी पक्षनेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींच्या सहभागाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. उमा भारती यांनी वयाच्या 12 व्या वर्षी राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतला होता. अयोध्या म्हणजे रामभक्तीवर आमची मक्तेदारी नाही पण प्रभू राम सर्वांचा, असे उमा भारती यांनी स्पष्ट सांगितले.

उमा भारती यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. "प्राण प्रतिष्ठेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण हा राम मंदिरतीर्थ क्षेत्र ट्रस्टचा निर्णय आहे. हा राजकीय कॉल नाही. रामभक्तीवर आमचा कोणताही कॉपीराइट नाही. भगवान राम आणि हनुमान जी भाजपचे नेते नसून ते आपला राष्ट्रीय अभिमान आहेत. कोणीही त्यांच्या मंदिराच्या अभिषेकात सहभागी होऊ शकतो आणि कोणालाही त्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते."

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याकडे राजकीय दृष्टीकोणातून पाहू नका. तुमच्या घरांमध्येही रामाची छायाचित्रे आहेत. त्यामुळे तुम्ही त्यात सहभागी व्हा. तुम्हाला मतं मिळणार नाहीत याची भीती बाळगू नका. मी भाजपच्या लोकांनाही सांगेन की, या अहंकारातून बाहेर पडा, फक्त तुम्हीच रामाची पूजा करू शकता. अहंकार किंवा भीतीपासून मुक्त राहून आपण सर्वांनी रामललाच्या अभिषेकात आनंदाने सहभागी झाले पाहिजे, असे उमा भारती म्हणाल्या, यावेळी त्यांनी विरोधकांना देखील सल्ला दिला. (Latest Marathi News)

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीची इमारत पाडली जात असताना उमा भारती तिथे उपस्थित होत्या. बाबरी विध्वंसासाठी आरोपी असलेल्या 32 जणांमध्ये त्या होत्या. दरम्यान 2020 मध्ये या सर्वांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. गेल्या वर्षी अलाहाबाद उच्च न्यायालयानेही त्यांच्या निर्दोष सुटकेविरुद्ध केलेले अपील फेटाळले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT