Ram Mandir Inauguration  esakal
देश

Ram Mandir Inauguration : अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर AAP चा मोठा निर्णय; दिल्लीमध्ये होणार 'हा' धार्मिक विधी

अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. अयोध्येसह देशभर आनंदोत्सव साजरा होणार आहे.

संतोष कानडे

Ram Mandir Inauguration News : अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. अयोध्येसह देशभर आनंदोत्सव साजरा होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी उद्घाटन सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पक्षाचं सरकार असलेल्या दिल्लीमध्ये 'आप'ने मोठा निर्णय घेतला असून शहरात मोठी शोभायात्रा निघणार आहे. यासह आम आदमी पक्षाने पूर्ण शहरामध्ये भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. शोभायात्रा आणि भंडाऱ्यामध्ये पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.

दिल्लीतल्या अरविंद केजरीवाल सरकारने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २२ जानेवारी रोजी सर्व सरकारी कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे एलजी विनय सक्सेना यांना एक प्रस्ताव पाठवला होता. शनिवारी एलजींनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने २० जानेवारीपासून तीन दिवसांपर्यंत भव्य रामलीलाचं आयोजन केलेलं आहे. रविवारी खुद्द केजरीवाल या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतल्या आयटीओजवळील प्यारेलाल ऑडिटोरियम येथे रामलीला संपन्न होत आहे. रामलीला सगळ्यांसाठी निःशुल्क असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात टक्केवारीवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांचा राडा; महापालिकेत शिवीगाळ आणि गोंधळ, VIDEO VIRAL

Who is Malad Fake Baba? मुंबईत भोंदूबाबाचा अघोरी प्रताप! अंगात देवी येते सांगून काढायचा 'भूत'; साहित्याची यादी पाहून तुम्हीही हादरून जाल

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

TCS AI Project: TCS सोबत योगी सरकारचा युपीमध्ये मोठा प्लॅन! AI क्रांतीमधून हजारो जॉब्सची निर्मिती

CSK ने RCB विरोधात ठोठावलं BCCI चं दार, दाखल केली तक्रार; पण असं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT