Ram Mandir Pran Pratishtha  
देश

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत UP ATSची मोठी कारवाई! तीन संशयितांना घेतलं ताब्यात

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केली आहे.

रोहित कणसे

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने अयोध्येत अर्श डल्ला गँगशी संबंधित तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान यूपी एटीएस आणि इंटेलिजन्सचे अधिकारी या तीन संशयितांची चौकशी करत आहेत. गुरुवारी संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयाचा तपास केला जात आहे. डीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात त्यांचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची पुष्टी झालेली नाही. दरम्यान ताब्यात घेतलेल्या तरुणांपैकी दोन तरुण राजस्थानमधील सीकर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत, यासोबतच देशभरातील अनेक दिग्गज मान्यवरांना देखील आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमिवर अयोध्योत मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

22 जानेवारीला होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा लक्षात घेऊन उत्तर प्रदेशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) कमांडो तैनात करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी 360-डिग्री सुरक्षा कव्हरेज प्रदान करण्यासाठी अँटी-माइन ड्रोन देखील तैनात केले आहेत.

राम मंदिर ट्रस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विधी 21 जानेवरी पर्यंत सुरू राहतील आणि प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी 212 आचार्य विधीचे संचालन करतील. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनीटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजता पूर्ण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT