Ayodhya Ram Mandir esakal
देश

Ayodhya Ram Mandir : इंडिया आघाडीसमोर धर्मसंकट! अयोध्येला जाण्यावरुन एकमत होईना, ममतांचा नकार

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना समारंभासाठी अयोध्येला जाण्यावरून ‘इंडिया’आघाडीत एकमत झालेले नाही. काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी अयोध्येला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीः राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना समारंभासाठी अयोध्येला जाण्यावरून ‘इंडिया’आघाडीत एकमत झालेले नाही. काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी येत्या २२ जानेवारीला अयोध्येला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. परंतु ‘इंडिया’आघाडीतील काही पक्षांनी मात्र हा समारंभ भाजपचा राजकीय ‘इव्हेंट’ असल्याचे म्हणत टीका केली आहे.

येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. या कार्यक्रमाला राम मंदिर निर्माण समितीने देशातील बहुतेक सर्व राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांना व इतर नेत्यांना निमंत्रण पाठविले आहे.

यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी व काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा समावेश आहे. याशिवाय इंडिया आघाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल या पक्षांच्या अध्यक्षांनाही निमंत्रण दिले आहे. यात माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचे जाहीर केले आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अद्यापही याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही तर ते या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.

ममतांचा नकार

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. परंतु त्या या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. ज्या प्रमाणे उत्तर भारतात श्रीरामाचे पूजन केले जाते, तेवढी आस्था बंगालमधील जनतेमध्ये नाही. त्यामुळे त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत तरी फारसा राजकीय तोटा होणार नसल्याचा दावा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादळ! उमेदवारीवरून खदखद वाढली; पक्षातच बंडाची चिन्हं

Video Viral : वैभव सूर्यवंशीने 'सेल्फी'साठी लहान मुलांकडे मागितले प्रत्येकी १०० रुपये; सोशल मीडियावर रंगलीय याची चर्चा...

Amazon चा मोठा प्लॅन! 100 शहरांमध्ये Quick Commerce विस्तार; 16,000 शेतकऱ्यांना जोडणार, ऑपरेशन्ससाठी 2,800 कोटींची गुंतवणूक जाहीर

Latest Marathi News Live Update : खरिपाच्या तोंडावर कृषी सेवा केंद्रांचा संप

भोंदूबाबा मनोहर मामा देत होता 'त्या' मराठी मालिकेला फंडिंग? मराठी अभिनेत्यानेच फोडलं बिंग, पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT