ncert syllabus change news esakal
देश

NCERT ने अयोध्येचा अध्याय बदलल्याने राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास संतापले, काय म्हणाले वाचा?

NCERT syllabus: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अनेक मोठे बदल केले आहेत.

Sandip Kapde

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अनेक मोठे बदल केले आहेत. अयोध्या आंदोलन आणि गुजरात दंगलीशी संबंधित महत्त्वाच्या घटनांच्या तपशिलाबाबत पुस्तकात बदल करण्यात आले आहेत. यावर विरोधक टीका करत आहेत. काल NCERT प्रमुख दिनेश सकलानी यांनी देखील स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान यावर आता अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास महाराज यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

सत्येंद्र दास महाराज म्हणाले, अभ्यासक्रमात केलेल्या बदलावर ते समाधानी नाहीत. बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात एनसीईआरटीच्या नवीन पाठ्यपुस्तकात काही उणिवा आहेत. पुस्तकात 6 डिसेंबर 1992 रोजी तीन घुमटाची रचना कशी हटवण्यात आली याचा उल्लेख नाही. पुस्तकात ते 9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्येचा निकाल दिल्यानंतरच माहिती देण्यात आली आहे.

राम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणाले, 'या पुस्तकात 6 डिसेंबर 1992 च्या घटनांचा तपशील नाही, जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली. 22 डिसेंबर 1949 रोजी मशिदीच्या आवारात प्रभू राम लल्ला यांची मूर्ती कधी प्रकट झाली याचा उल्लेख पुस्तकात नाही.

तर NCERT चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी अभ्यासक्रमाचे भगवेकरण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. दंगली शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये का शिकवल्या पाहिजेत?, असा सवाल देखील सकलानी यांनी उपस्थित केला.

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अनेक मोठे बदल केले आहेत. यामध्ये बाबरी मशीद हा शब्द काढून टाकण्यात आला आहे, त्याऐवजी तीन घुमट वास्तू असे वर्णन करण्यात आले आहे. याशिवाय अयोध्येचा अध्याय चार पानांवरून दोन पानांचा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT