RBI Truck Broke Down Sakal
देश

RBI Truck : 535 कोटींची रक्कम घेऊन जाणारा RBIचा ट्रक रस्त्यातच झाला खराब; लगेच जमा झाले लोकं अन्...

ही माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी गराडा घातला

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : तब्बल ५३५ कोटी रूपयांची रोकड घेऊन जाणारा रिझर्व बँक ऑफ इंडियाचा ट्रक अचानक खराब झाल्याचा प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी पोलिसही दाखल झाले पण या घटनेची माहिती आजूबाजूला पसरताच तिथे लोकांचा गराडा जमा झाला. ही घटना तामिळनाडू येथील चेन्नईमध्ये घडली आहे.

अधिक माहितीनुसार, हा ट्रक विल्लुपूरम येथे खराब झाल्यानंतर क्रोमपेट पोलिसांना यासंदर्भात फोन आला आणि तत्काळ पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली. यानुसार पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. खराब झालेल्या गाडीजवळ पोलीस पाहून स्थानिकांनी सदर गाडीजवळ गराडा घातला आणि त्यांना गाडीमध्ये पैसे असल्याची चुणूक लागली.

तांबरम येथील सहाय्यक आयुक्त श्रीनिवास हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी सांगितलं की, चेन्नई येथील दोन ट्रक भारतीय रिजर्व बँकेची कॅश घेऊन निघाले होते पण रस्त्यामध्ये एका गाडीचे इंजीन खराब झाले. त्यानंतर हे इंजिन दुरूस्त करण्याचा बराच प्रयत्न केला गेला पण त्याला यश आले नाही. त्यामुळे खराब झालेला ट्रक पुन्हा रिझर्व बँकेजवळ ओढत नेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT