Delhi Republic Day 2023 
देश

Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 'खलिस्तान जिंदाबाद'चे पोस्टर्स; प्रशासनाची कारवाई

पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीमधील काही भागात भिंतींवर 'खलिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा रंगवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानं दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. (Republic Day Khalistan Zindabad posters in Delhi Police administration in action)

दिल्ली पोलिसांचे पीआरओ सुमन नलवा यांनी सांगितलं की, 'खलिस्तान जिंदाबाद', 'सार्वमत घ्या' अशा प्रकारच्या घोषणा भितींवर रंगवण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. दिल्लीच्या पश्चिम विहार भागात आज ही घटना घडली आहे. याची खबर मिळताच पोलिसांनी या घोषणा पुसून टाकल्या आहेत.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

काही तरुणांनी या घोषणा भिंतीवर रंगवल्या आहेत. पण हा शहराच्या सुरक्षेसंबंधीचा विषय नाही. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहितीही यावेळी सुमन नलवा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा दिल्लीत एल्गार! अभिजीत दीपकेंच्या पक्षाकडून ५ सप्टेंबरला मोर्चाची घोषणा; काय आहेत मागण्या?

NEET PG Admit Card 2026: ३० ऑगस्टला होणार नीट पीजी परीक्षा; डायरेक्ट लिंकवरून 'असे' डाऊनलोड करा हॉल तिकीट...

भारत-पाकिस्तान सीमेवर ‘तारिणी’चं शूटिंग! बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ठरली पहिली मराठी मालिका!

Marathi News Live Updates : E20 इंधनाच्या मुद्द्यावर लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा यासाठी आम्ही आज एक व्हॉट्सॲप क्रमांक जारी करत आहोत - केजरीवाल

Palghar Ashramshala: गडचिराेलीनंतर पालघरच्या आश्रमशाळेत धक्कादायक घटना; ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, १९ जणांना ताप

SCROLL FOR NEXT