Rita Bahuguna Joshi Rita Bahuguna Joshi
देश

‘खासदारकीचा राजीनामा देते; पण, माझ्या मुलाला तिकीट द्या’

सकाळ डिजिटल टीम

भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) यांनी मुलगा मयंक जोशी यांना लखनौ (Lucknow) कैंटमधून तिकीट मिळावी यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून मत मांडले. भाजपने (BJP) खासदारांना तिकीट नाकारले आहे. पक्षाने ‘एक कुटुंब एक तिकीट’ जाहीर केले आहे. यामुळे जोशी यांच्या मुलाच्या तिकीट मिळण्यावर संशय आहे.

पक्षाने एका कुटुंबातील एका व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाल्यावर मी याबाबत पत्र लिहिले आहे. एखाद्याला निवडणुकीच्या राजकारणात यायचे असेल आणि दीर्घकाळ समाजसेवा करायची असेल तर त्याला तिकिटाची अडचण नसावी, असे रिटा बहुगुणा जोशी म्हणाल्या. २०२४ ची निवडणूक न लढवण्याची घोषणा मी आधीच केली आहे, असेही रिटा जोशी (Rita Bahuguna Joshi) म्हणाल्या.

मला खासदारकी सोडून पक्षाचे काम करायचे आहे. विद्यमान खासदाराच्या मुलाला तिकीट देण्यात अडचण आल्यास आपण खासदारकी सोडण्यास तयार असल्याचे रिटा बहुगुणा यांचे म्हणणे आहे. रिता जोशी लखनौ कैंटमधून ज्या जागेवरून तिकीट मागत आहेत, तिथे भाजपच्या अनेक नेत्यांनी दावेदारी केली आहे. रिटा बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. रिटा सांगतात की त्यांचा मुलगा २००९ पासून राजकारणात सक्रिय आहे. लोकांसाठी काम करीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा मयंक जोशी यांना तिकीट मिळायला हवी.

तिकीट मागणाऱ्यांच्या यादीत हेही

रिटा यांच्याशिवाय भाजप खासदार जगदंबिका पाल, केंद्रीय मंत्री कौशल किशोर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचीही नावे भाजपमध्ये मुलांसाठी तिकीट मागणाऱ्या यादीत आहेत. या सर्वांनी मुलांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्याची मागणी केली आहे.

बुधवारी नावे जाहीर होण्याची शक्यता

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये (BJP) मंथन सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील तिकिटे बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT