robert-vadra shirdi sakal
देश

Shirdi Saibaba: रॉबर्ट वाड्रा यांनी शिर्डीत घेतले साईसमाधीचे दर्शन, मोदींवर केली टीका

शिर्डीत घेतले साईसमाधीचे दर्शन

राजेश नागरे, सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : साईबाबांची शिकवणुक आणि राहुल गांधी यांची विचारसरणी एकच आहे. ते देशातील सामान्य लोकांच्या आकांक्षाचे प्रतीक आहेत. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे देशाची प्रगती आणि नव्या तंत्रज्ञानाबाबतचे स्वप्न ते पूर्ण करतील. केंद्र सरकारच्या अपयशाबाबत बोलतो म्हणून आम्हाला ट्रोल केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून बोलणार ही बातमी कळताच लोकांना भिती वाटते, अशी टीका उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांनी केली.

आज त्यांनी येथे येऊन साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, सुमित शेळके, माजी नगरसेवक सचिन चौगुले, शहर उपाध्यक्ष अमृत गायके, श्रीकांत अहिरे आदी उपस्थित होते.

वाड्रा म्हणाले, मोदी देशाला संबोधून काही बोलणार असे जाहिर झाले की लोकांना भीती वाटते. आता आपल्यापुढे आणखी काय वाढवून ठेवले असे लोकांना वाटते. याउलट स्व. राजीव गांधी यांच्यावर लोकांनी मनापासून प्रेम केले. त्यांच्या भोवताली लोकांचा गराडा असायचा. त्यांनी देशात नवे तंत्रज्ञान आणले त्यातून देशाची प्रगती साधली. राहुल यांच्या पदयात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यात महिलांची संख्या लक्षणीय असते.

बेरोजगारी आणि महागाई असे अनेक प्रश्न देशासमोर आहेत. राहुल लोकांना सोबत घेऊन पुढे निघाले आहेत. त्यातून आज ना उद्या परिवर्तन होणार आहे. आम्हाला त्याबद्दल विश्वास वाटतो आहे.

आम्ही केंद्र सरकारच्या अपयशा बाबत बोलतो म्हणून आम्हाला ट्रोल केले जाते. राहूल, प्रियंकासह आम्ही सर्वजण एकत्र आहोत. या ट्रोल केले जाते याची फिकीर न करता एकत्र राहून बोलत राहू. राहूल गांधी यांच्या सोबत लोक आहेत. आमचे काम यापुढेही सुरूच ठेवणार आहोत. लोकांचे प्रश्न हाती घेऊन राहूल संघर्ष करीत आहेत. त्यांना जनसमर्थन लाभते आहे.

- रॉबर्ट वाड्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT