देश

पैसे परत मिळण्याचा त्यांचा हक्कच : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाच्या संकंटामुळे जगभरातील व्यवहार अनेक दिवासंपासून ठप्प झाले. भारतात देखील मार्च महिन्यापासून लॉकडाउन पाळण्यात आला. त्यानंतर, अनलॉक करणे या उद्देशाने अनलॉक 1 ला नुकताच प्रारंभ झाला आहे. हळू हळू सर्वच व्यवहार सुरळीत होऊ लागले आहे. परंतु, अद्यापही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या काही केल्याने कमी होताना दिसत नाही. देशात आत्तापर्यंत लाखो लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे. दरम्यान कोरोना लॉकडाउन काळात विमान प्रवासाचं बुकिंग केलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचं परतावा (रिफंड) करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. याबाबतची माहिती आमदार चव्हाण यांनी ट्‌विटच्या माध्यमातून मांडली आहे. त्यामध्ये उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी पत्र लिहिल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्चमध्ये देशात अचानक लॉकडाउन जाहीर केले. त्यानंतर देशात सर्वत्र व्यवहार बंद झाले. यामुळे बाजारपेठांपासून ते छोट्या विक्रेत्यांचे व्यवहारच ठप्प झाले. देश आणि परदेशातील दळणवळण देखील बंद झाली. परिणामी विमान प्रवास देखील 21 दिवसांसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर, अद्यापही हा लॉकडाउन सुरुच आहे. अनलॉक 1 हा कालावधीत सुरु झाला आहे. आता हळू हळू सर्वच व्यवहार सुरु होत आहेत. परंतु त्याची गती कमी आहे.देशातील नागरिकांनी रेल्वे आणि विमानाचे तिकीट बुकींग केले होते. मात्र, अचानक लॉकडाउन घोषित केल्यामुळे या प्रवाशांचा प्रवास पूर्णत्वास गेला नाही. देशात आणि विदेशात प्रवास करण्यासाठी लाखो प्रवाशांनी विमानाचे बुकिंग केले होते. परंतु, त्यांनाही आपला प्रवास रद्द करावा लागला आहे. त्यामुळे, या रद्द झालेल्या प्रवासाच्या तिकीटांचा परतावा (रिफंड) लवकरात लवकर करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहून विमानकंपन्यांकडून प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. ठराविक कालावधीत हे पैसे परत मिळणे आवश्‍यक आहे, प्रवाशांना तो ग्राहकाधिकार असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच विमान कंपन्यांकडून त्याबाबतचे स्पष्टीकरण मागावे असेही चव्हाण यांनी नमूद केले आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT