schools sakal
देश

शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थ्याची सुप्रीम कोर्टात धाव; न्यायाधीश म्हणाले...

याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशभरातील शाळा सुरु करण्यात याव्यात यासाठी एका विद्यार्थ्यानं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पण कोर्टानं त्याच्या याचिकेवर सुनावणीला नकार दिला. याचिकाकर्त्या विद्यार्थ्यानं अभ्यासकडे लक्ष द्यावं असा सल्ला त्याला कोर्टानं दिला. राज्य सरकारं स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेत असल्याचंही यावेळी कोर्टानं म्हटलं.

दिल्लीतील रहिवासी असलेल्या एका बारावीतील विद्यार्थानं देशभरातील शाळा उघडण्यात याव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ही याचिका आज सुनावणीसाठी कोर्टासमोर आली मात्र, कोर्टात सुनावणीस नकार दिला. यावेळी सुनावणी करणारे न्या. डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, "विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन शिक्षण सुरु करण्यासाठी पुन्हा शाळा सुरु करण्याचे आदेश आम्ही देऊ शकत नाही. कारण नेमका धोका कुठे असेल हे आम्ही सांगू शकत नाही. कोणत्या जिल्ह्यात सध्या कोविडच्या घटना अधिक आहेत, हे ही आम्हाला माहिती नाही. मुलांनी आता पुन्हा शाळेत जायला हवं यात काही शंका नाही. पण हे राज्य सरकारांनी निश्चित करणं गरजेचं आहे. हा असा मुद्दा आहे ज्याची जबाबदारी राज्यांवर सोपवणं योग्य राहिल"

"आम्ही याला पब्लिसिटी स्टंट म्हणत नाही पण ज्या प्रकारचा दिलासा देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे, ती मागणी चुकीची आहे. कारण विविध राज्यांचे नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे याबाबतचे आदेश सर्व राज्यांसाठी एकसारखे होऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांना अशा प्रकारची याचिका दाखल करता कामा नये. सरकारं याबाबत जागृत आहेत" काही राज्यांनी यापूर्वीच शाळा सुरु केल्या आहेत, असंही यावेळी न्या. चंद्रचूड म्हणाले.

दरम्यान, दिल्लीतील अमर प्रेम प्रकाश (वय १२) या विद्यार्थाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत शाळा सुरु करण्याची मागणी केली होती. याचिकेत त्यानं म्हटलं की, "गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपासून शाळा बंद आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकदृष्ट्या परिणाम होत आहे. अनेक विद्यार्थी तणावग्रस्त बनले आहेत. ऑनलाईन सुरु असलेल्या वर्गांमुळे योग्य प्रकारे अभ्यास होत नाहीए"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT