Delhi Schools eSakal
देश

Delhi Schools : थंडीच्या लाटेमुळे दिल्लीमधील पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी; पुढील पाच दिवस राहणार बंद

आतिशी यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार आता सोमवारपासून केवळ सहावीपासून पुढचे वर्ग सुरू होणार आहेत. पाचवीपर्यंतच्या वर्गांना आणखी पाच दिवस सुट्टी असणार आहे.

Sudesh

Delhi School : दिल्लीमध्ये पाचव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील पाच दिवस सुट्टी घोषित करण्यात आली आहे. वाढती थंडी आणि धुक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी याबाबत माहिती दिली.

सुट्ट्यांच्या आदेशाबाबत संभ्रम

दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयाने शनिवारी असं घोषित केलं होतं, की शाळांच्या हिवाळी सुट्ट्या 10 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. मात्र या आदेशात त्रुटी असल्याचं सांगत शनिवारी रात्री हा आदेश मागे घेण्यात आला होता. त्यानंतर आता सोमवारी शाळा सुरू होणार अशी चिन्हं दिसत होती.

आतिशी यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार आता सोमवारपासून केवळ सहावीपासून पुढचे वर्ग सुरू होणार आहेत. पाचवीपर्यंतच्या वर्गांना आणखी पाच दिवस सुट्टी असणार आहे.

दिल्लीमध्ये सध्या थंडीची लाट आली असून, पुढील काही दिवस दाट धुकं राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच दिल्ली परिसरात हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात येतो आहे. या सर्व शक्यतांमुळे दिल्लीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री घरात घुसून महिलेचे कपडे उचलणं बलात्काराचा प्रयत्न नाही, हायकोर्टाचा आरोपीला दिलासा

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT