Serum Institute of India Google file photo
देश

बूस्टर डोसच्या ट्रायल घ्या आणि डेटा द्या; SECची सीरमला सूचना

बूस्टर डोस बनवण्याचा प्रस्ताव नाकारला

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात वाढत्या ओमिक्रॉन कोरोना व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर विषय तज्ज्ञांच्या समितीनं (SEC) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (SII) बूस्टर डोसबाबत ट्रायल घ्यायच्या सूचना केल्या आहेत. तसेच भारतीय लोकसंख्येशी संबंधीत ट्रायलचा डेटा सादर करण्यासही सांगितलं आहे. यासंदर्भात १० डिसेंबर रोजी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत SECची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी सीरमला बूस्टर डोस देण्यास परवानगी नाकारली.

नकाराचं कारण काय?

SIIने यापूर्वी कोरोना व्हायरस लस (रिकॉम्बिनंट) कोविशील्डच्या नमुना माहितीमध्ये (PI) सुधारणांचा प्रस्ताव सादर केला होता. युकेमध्ये आयोजित केलेल्या ऑक्सफर्ड/अॅस्ट्राझेनेका लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांच्या निकालांवर आधारित दुसऱ्या डोसच्या सहा महिन्यांनंतर बूस्टर (तिसरा) डोस देण्याची परवानगी मागितली होती. पण SEC ने काही अशी निरीक्षणे नोंदवली आणि भारतातील बूस्टर डोसला परवानगी नाकारली. याची कारण अशी....

१. SEC समितीने नोंदवलंय की लस कंपनीनं UKमधील अभ्यासातून केवळ 75 विषयांचा इम्युनोजेनिसिटी डेटा सादर केला होता.

२. SII ने भारतीय लोकसंख्येकडून बूस्टर डोसची आवश्यकता जनसांख्यिकीय प्रोफाइल आणि कमी होत जाणारी इम्युनोजेनिसिटी, पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर इ. दर्शविण्यासाठी कोणताही डेटा सादर केलेला नाही.

3. फर्मने बूस्टर (तृतीय) डोससाठी स्थानिक क्लिनिकल चाचणी डेटा तयार करण्याचा प्रस्ताव देखील सादर केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Food Poisoning: महाप्रसादातून विषबाधा, गर्भवतीने बाळाला जन्म दिला पण दीड दिवसातच चिमुकल्याचा मृत्यू

IND vs NZ 3rd T20I: भुवनेश्वर कुमार, वैभव सूर्यवंशी OUT; इशान किशन IN! तिसऱ्या सामन्यासाठी Playing XI मध्ये होणार बदल

Ichalkaranji Crime : पहाटे भांडले, पत्नीने झोपेच सोंग घेत पतीचा काटा काढला अन्; झोपून सकाळी मुलीसोबत पोलिस स्टेशन गाठलं, इचलकरंजीत धक्कादायक घटना

Latest Marathi News Update : विहिरीच्या पाणी घेण्यावरून वाद, पुतण्यानं काका-काकूची केली हत्या

Nagpur Weather: पूर्व विदर्भात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT