China New Virus eSakal
देश

China New Virus : चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या नव्या विषाणूची दिल्लीत एन्ट्री? केंद्र सरकारने दिलं स्पष्टीकरण

अद्याप कोरोना पूर्णपणे संपला नाही, तोपर्यंतच चीनमधील आणखी एका विषाणूने भारतात एन्ट्री केल्याचं म्हटलं जात आहे.

Sudesh

चीनमध्ये काही दिवसांपासून थैमान घातलेल्या मायक्रोप्लाजमा न्यूमोनिया या बॅक्टेरियाची लागण झालेले सात रुग्ण दिल्लीतील एम्समध्ये दाखल झाले होते, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र, हा दावा खोटा असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणानंतर एम्स रुग्णालयाने देखील असं काही नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

काय म्हणालं सरकार?

"चीनमध्ये थैमान घालणाऱ्या न्यूमोनिया विषाणूचे रुग्ण दिल्लीमध्ये आढळल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे. मात्र, हा रिपोर्ट खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हा न्यूमोनियाचा अगदी सामान्य असा व्हेरियंट आहे. दिल्लीतील एम्समध्ये आढळलेल्या रुग्णांचा आणि चीनमध्ये पसरणाऱ्या न्यूमोनियाचा काहीही संबंध नाही." असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

"एम्सने पीसीआर आणि आयजीएम एलिसा या दोन चाचण्यांच्या माध्यमातून या सात प्रकरणांचा शोध लावला. या चाचण्यांचा पॉझिटिव्हीटी रेट 3 आणि 16 टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमधील न्यूमोनियाच्या रुग्णांची चाचणी केल्यानंतर त्यांना चीनमधील विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं." असं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत होतं.

लॅसेंट मायक्रोबने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. यात म्हटलं होतं, की एका प्रकरणात सुरुवातीच्या टप्प्यात केलेल्या पीसीआर चाचणीमुळे या विषाणूची ओळख पटली. तर बाकी सहा प्रकरणांमध्ये आयजीएम एलिसा चाचणीच्या माध्यमातून विषाणूची ओळख पटली आहे. मात्र, आता सरकारच्या स्पष्टीकरणामुळे असं काही नसल्याचं सिद्ध झालं आहे.

काय आहेत लक्षणं?

चीनमध्ये प्रसार होत असणाऱ्या या विषाणूची लागण झाल्यानंतर अगदी सामान्य न्यूमोनियाचीच लक्षणे दिसतात. घसा खराब होणे, थकवा जाणवणे, ताप येणे, दीर्घकाळ खोकला राहणे आणि डोकेदुखी अशा लक्षणांचा यात समावेश आहे.

चीनमध्ये थैमान

चीन आणि काही युरोपियन देशांमध्ये या विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो आहे. याला 'वॉकिंग न्यूमोनिया' असं नावही देण्यात आलं आहे. हा विषाणू मुख्यत्वे लहान मुलांना टार्गेट करत असल्यामुळे चिंता जास्त वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT