देश

हरयाणात आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; शरद पवार म्हणतात...

विनायक होगाडे

चंडीगड : हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा निषेध करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर शेजारच्या कर्नाल जिल्ह्यामध्ये पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर हरयाणात शेतकरी संघटनांनी विविध ठिकाणांवर आज रास्तारोको आंदोलन केले. पोलिसांच्या या लाठीहल्ल्यात दहाजण जखमी झाल्या समजते. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे फतेहगड- चंडीगड, गोहाना-पानिपत आणि जिंद-पतियाळा या महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली असून अंबाला- चंडीगड आणि हिसार- चंडीगड हे महामार्ग देखील ठप्प झाले आहेत.

या मारहाणीचा निषेध आता सर्व स्तरातून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही या नृशंस प्रकाराच निषेध नोंदवला आहे. त्यांनी म्हटलंय की, हरयाणा पोलिसांकडून शेतकऱ्यांना झालेली क्रूर मारहाण पूर्णपणे अयोग्य आहे. शेतकऱ्यांचा हा निषेध शांततापूर्ण सुरु असताना देखील पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे अनेक शेतकरी जबर जखमी झाले आहेत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.

दुसरीकडे, पोलिसांनी जाणीवपूर्वक केलेल्या लाठीहल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाल्याचा आरोप हरयाणा भारतीय किसान युनियनचे (चढूनी) प्रमुख गुरनामसिंग चढूनी यांनी केला आहे. पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणांवर शेतकऱ्यांनी महामार्गांवरच खाटा, बांबूचे पलंग आडवे टाकून ठिय्या आंदोलन केले. तत्पूर्वी कर्नालपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बस्तारा टोलनाक्याजवळ आंदोलक शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. यात आठ ते दहाजण जखमी झाले आहेत.

याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय की, आज शेतकऱ्यांचे रक्त रस्त्यांवर सांडले. खट्टरसाहेब येणाऱ्या पिढ्या हे लक्षात ठेवतील. तुम्हीच हरयाणातील जनतेवर लाठीहल्ला केला होता. तर दुसरीकडे स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी म्हटलंय की, शेतकरी हे मुख्यमंत्री खट्टर यांच्याविरोधात आंदोलन करत होते, राज्य पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT