Sharad Pawar News Esakal
देश

Sharad Pawar: "गुजरात अन् 2, 3 छोट्या राज्यात भाजप, आता..."; शरद पवारांनी केली राजकीय भविष्यवाणी

Sharad Pawar made a political prediction...

Sandip Kapde

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना राजकीय भविष्यवाणी केली. यावेळी त्यांनी भाजप व अजित पवार गटावर टीका केली. जनता आता भाजपला दूर करेल, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, "देशात अनेक ठिकाणी भाजप नाही. केरळ, हैद्राबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथं भाजप नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेश इथं सरकार पाडून भाजपने सरकार बनवलं. पंजाब, दिल्ली, ओडिशा, पश्चिम बंगाल इथं भाजप नाही. गुजरात आणि 2 ते 3 छोट्या राज्यात भाजप आहे. म्हणून मी म्हणतो देशाचा मूड बदलला आहे. लोक या बदलत सहभागी होत आहे. जनता आता देशाला दूर करेल."

माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर सर्वांच्या सह्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगातील निर्णय आपल्या बाजून लागेल, अशा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी केंद्र सरकारवर देखील हल्लाबोल केला आहे. लोकांना तपास यंत्रणा माहित नव्हत्या पण आता विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे.

पूर्वीचे पंतप्रधान आणि आताचे पंतप्रधान यांच्यात खूप फरक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्ट असल्याचे त्यांनी म्हटले होते. आम्ही त्यांना पुरावे मागितले. चौकशी करण्याची मागणी केली. मात्र त्यांच्याविरोधात आरोप होते. त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान दिले, असे शरद पवार म्हणाले. (Latest Marathi News)

निवडणूक आयोगाचा निर्णय काहीही आला तरी चिंता करण्याची गरज नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, असे शरद पवार म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT