Shashi Tharoor Sakal
देश

Shashi Tharoor: शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत? सोनिया गांधींचाही होकार

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत घडामोडी सध्या सुरू आहेत. राहुल गांधी यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत असताना काँग्रेसचे माजी खासदार शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

(Shashi Tharoor Latest Updates)

त्याचबरोबर येत्या १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोनिया गांधीने त्यांना परवानगी दिल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी पक्षातील सर्वांना स्वातंत्र्य आहे असं सोनिया गांधी यांनी थरूर यांना सांगितलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मागच्या काही दिवसांत पक्षांतर्गत कुरघोडी होत असल्याचं आपल्याला पहायला मिळालं होतं. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस आणि राजस्थान काँग्रेस कमिटीने राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही पूर्णपणे लोकशाही पद्धतीने होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षातील कोणताही पदाधिकारी अध्यपदाची निवडणूक लढण्यास पात्र असल्याची माहिती पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आली आहे.

"ही निवडणूक स्वतंत्र आहे, ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याचे स्वागत आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी यांची ही भूमिका आहे. ही एक खुली, लोकशाही आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. उमेदवारीसाठी कुणालाही नकार दिला जाणार नाही" असं काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले आहेत. तर निवडणूक लढवायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे, निवडणूका लोकशाही पद्धतीने होणार आहेत असं सोनिया गांधी यांनी थरूर यांना सांगिल्याची माहिती समोर आली आहे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer : अभिनेत्यांना नोटीस बजावताच तुकाराम मुंढेंच्या बदलीची चर्चा? २१ वर्षांत २५ बदल्या; FDAमधील धडक कारवाईने पुन्हा चर्चेत

पोलिसांच्या मारहाणीत ५५ वर्षीय पुजाऱ्याचा मृत्यू, कुटुंबियांचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय घडलं?

Paithan Farmers: शेतात जाण्यास रस्ताच नाही! दोन वर्षे पाठपुरावा करूनही न्याय नाही; शेतकरी भावंडांचे आमरण उपोषण

AAMIR KHAN FITNESS: 61 व्या वर्षी देखील आमिर खान फिट कसा? केबीसीच्या सेटवरच सांगून टाकलं गुपित, म्हणाला... 'मी रोज सकाळी उठून...'

Marathi News Live Updates : आंबोलीत ट्रकची कारला जोरदार धडक; दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT