Eknath shinde uddhav Thackeray supreme court hearing cji shiv sena sakal
देश

ShivSena: धनुष्यबाण, आमदार अपात्रेच्या याचिकेवर ठाकरे गटाला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टात काय झालं? जाणून घ्या

शिवसेनेचे खासदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

New Delhi News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कोर्टानं आज दिलासा देण्यास नकार दिला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे. कोर्टानं तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर निश्चित तारीख देण्यासही कोर्टानं नकार दिला आहे. (Shiv Sena Uddhav Thackeray group has no relief from Supreme Court)

शिवसेनेचे खासदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या आपात्रतेचा विषयावर तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केलं आहे हे बेकायदा आहे, यावर निर्णय घेण्याचे घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष तसेच निवडणूक आयोगाला द्यावेत अशी विनंती केली होती.

यावेळी अधिवक्ता अमित आनंद तिवारी यांनी म्हटलं की, "कोर्टानं हे प्रकरण 31 रोजी सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या हे प्रकरण घटनापीठाच्या निकालात समाविष्ट आहे. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरवरील घटनापीठ संपेपर्यंत प्रतीक्षा करा, आम्ही तुम्हाला तारीख देऊ.

यावर पुन्हा तिवारी म्हणाले की, ही याचिका तातडीची याचिका आहे. यावर चंद्रचूड म्हणाले, ही याचिका धनुष्यबाण चिन्हाबद्दल आहे का? असेल तर आम्हाला ती ऐकावी लागेल. घटनापीठासाठी प्रतीक्षा करा, आम्ही याची यादी तयार करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT