Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाचं असंही चीन कनेक्शन; धक्कादायक माहिती समोर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः श्रद्धाचा खून करुन तिचे ३५ तुकडे करणारा क्रूरकर्मा आफताब पूनावाला याच्याकडून एक मोठा खुलासा समोर आलेला आहे. काल त्याची नार्को टेस्ट झाली. त्याच्याकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचं चीन कनेक्शन समोर आलेलं आहे. निर्दयीपणे त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले त्यासाठी त्याने जे चॉपर वापरलं त्यासंबंधी माहिती समोर आली आहे.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबने जे चॉपर वापरलं ते चाईनीज होतं. नार्को टेस्टदरम्यान आफताबने ते चॉपर कुठं टाकलं त्याबद्दल माहिती दिली. गुरुग्राम येथील त्याच्या कार्यालयासमोर झाडीत ते हत्यार फेकून दिलं. शिवाय श्रद्धाचं शीर महरौलीच्या जंगलात फेकल्याचं त्यांने सांगितलं.

आफताब सध्या तिहार जेलमध्ये आहे. गेल्या दोन आठवड्यापासून हे प्रकरण सुरू आहे. या सर्वादरम्यान, आफताबच्या आवडी निवडी समजल्या आहेत. यामध्ये आफताबला बुद्धीबळ खेळायला आवडतं असल्याचे समजले.

तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅरेक क्रमांक-4 मध्ये बंद असलेला आफताब वेळ घालवण्यासाठी तासन्तास बुद्धिबळ खेळतो. आफताब कोणाशीही बोलत नाही, परंतु जेव्हा दोन चोर बुद्धिबळ खेळत असतात तेव्हा तो एकटक बुद्धिबळकडे पाहत राहतो. खेळादरम्यान, कोणालाही तो मदत करत नाही. तो त्याच्या बॅरेकमध्ये एकटाच बुद्धिबळाचा पट लावतो, अशी माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT