Sonia Gandhi Admitted esakal
देश

Sonia Gandhi Admitted: सोनिया गांधींची प्रकृती खालवली, दिल्लीच्या रुग्णालयात दाखल

रुपेश नामदास

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती शुक्रवारी अचानक बिघडली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना ताप आल्याने त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी अजूनही निरीक्षणात असून त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, आता प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. अरुप बसू यांच्या देखरेखीखाली सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना श्वास घेण्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता, ज्यामुळे त्यांना अनेकदा नेब्युलायझेशन होते, यावेळी देखील याच कारणासाठी दाखल करण्यात आले आहे. सर गंगाराम हॉस्पिटल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी सोनिया गांधी यांची प्रकृती बरी असल्याचे सांगितले आहे.

सोनिया गांधी आता प्रकृतीच्या समस्येमुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत. मात्र, पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना त्या नक्कीच उपस्थित असतात. नुकतेच ते छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनात दिसल्या. येथे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधितही केले.

सोनिया गांधी यांना फुफ्फुसाचा त्रास आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ४ जानेवारी रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कमी उंचीचा आंदोलक, पळून थकताच जवानाने उचलून कडेवर घेतल; पोलिसांकडे सोपवलं, VIDEO VIRAL

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

SCROLL FOR NEXT