BJP News esakal
देश

भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया हेडवर गुन्हा दाखल; 'सपा'कडून जहरी टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. समाजवादी पार्टीने भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया हेडवर गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या ट्विटर हँडलचे संचालक मनीष जगन अग्रवाल यांच्या अटकेनंतर समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच आज सपाच्या वतीने भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया इंचार्ज ऋचा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी लखनऊच्या हजरतगंज ठाण्यात तक्रार दिली. ज्यात त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया इंचार्ज डॉ. ऋचा राजपूत यांच्यावर डिंपल यादवांच्या ट्विटर अकाऊंटवर अभद्र टिपण्णी केल्याचा आरोप लावला आहे. पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.

लखनऊच्या हजरतगंज पोलिसांनी मनीष जगन अग्रवाल यांनी रविवारी सकाळी अटक केली होती. समाजवादी पार्टीच्या ट्विटर हँडलवरुन केलेल्या अभद्र टिपण्णीवरुन हजरतगंज कोतवालीमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे. सांगितलं जात आहे की, मनीष जगन अग्रवाल हेच सपाचं ट्विटर हँडल सांभाळत होते आणि तेच सीतापूरचे रहिवाशी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT