special apology 186 prisoners of state will be released from jail on Independence Day sakal
देश

Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून होणार सुटका

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कारागृहात चांगली वर्तणूक आणि निकषानुसार पात्र असलेल्या कैद्यांना विशेष माफी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कारागृहात चांगली वर्तणूक आणि निकषानुसार पात्र असलेल्या कैद्यांना विशेष माफी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १८६ कैद्यांना स्वातंत्र्यदिनी मंगळवारी (ता. १५) कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.

‘कैद्यांमध्ये शिस्त आणि त्यांच्या आचरणात सधारणा व्हावी, हा माफी योजनेचा उद्देश आहे. कारागृहातून सुटका होणाऱ्या कैद्यांनी गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक व्हावे,’’ असे आवाहन राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केले. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर या वेळी उपस्थित होते.

केंद्रीय गृह सचिवालयाकडून माफी योजनेचे निकष देण्यात आले आहेत. कैद्यांची पात्रता तपासण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने एकूण तीन टप्प्यांत ५८१ कैद्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या प्रस्तावास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ कैदी, दुसऱ्या टप्प्यात २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैदी कारागृहातून मुक्त करण्यात आले आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात येत्या १५ ऑगस्ट रोजी १८६ कैद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.

विशेष माफीचे निकष आणि कैद्यांची संख्या -

- वयाची ६० वर्षे पूर्ण आणि एकूण शिक्षेच्या ५० टक्के कालावधी पूर्ण - ७

- १२ ते २१ वर्षे वयोगटात गुन्हा केल्यानंतर पुन्हा गुन्हा केलेला नसावा. तसेच, शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण - १०

- शिक्षेचा कालावधी पूर्ण केला परंतु दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ- २

- एकूण शिक्षेच्या कालावधीपैकी दोन तृतीयांश किंवा ६६ टक्के कालावधी पूर्ण करणारे कैदी- १६७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री घरात घुसून महिलेचे कपडे उचलणं बलात्काराचा प्रयत्न नाही, हायकोर्टाचा आरोपीला दिलासा

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT