Terrorism 
देश

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा शाळेत गोळीबार; दोन शिक्षकांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगरमध्ये एका शाळेत गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

श्रीनगरमध्ये एका शाळेत गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी शाळेच्या शिक्षकांवर गोळीबार केला असून यात मृतांमध्ये महिला मुख्याध्यापकाचा समावेश आहे. जखमी झाल्यानंत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीनगरमधील इदगाह परिसरात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. महिला मुख्याध्यापिकेचं नाव सतिंदर कौर असं आहे तर शिक्षकाचे नाव दीपक चांद असं आहे. दोघांचाही दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसंच दहशतवाद्यांचा शोध परिसरात घेतला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांवर गेल्या काही महिन्यात हल्ले होण्याचं प्रमाण वाढल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT