Vijay Mallya sakal
देश

विजय मल्ल्याला SC चा दणका, 4 महिन्याचा तुरुंगवास, २ हजाराचा दंड

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता.

सकाळ डिजिटल टीम

फरार उद्योगपती विजय मल्ल्या याला न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखाली रविंद्र एस भट आणि पी एम नरसिंह यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. खंडपीठाने १० मार्च रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. (Vijay Mallya News)

सर्वोच्च न्यायालयाने ४ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि फरारी उद्योगपती विजय मल्ल्याला २००० रुपयांचा दंड ठोठावला. २०१७ मध्ये न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल तो दोषी ठरला होता.

या प्रकरणी त्याच्या शिक्षेचा निर्णय़ राखून ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) २०१७ च्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी मल्ल्याच्या बाजूने पुनर्रिक्षण याचिका २०२० मध्ये रद्द केली होती. न्यायालयाने आपल्या आदेशांचा दाखला देत आपल्या मुलांच्या बँक खात्यामध्ये चार कोटी डॉलर ट्रान्सफर करणं हा न्यायालयाचा अपमान असल्याचं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT