देश

तीन महिन्यांच्या मुदतीत 40 मजली ट्विन टॉवर्स पाडा - सुप्रीम कोर्ट

विनायक होगाडे

नवी दिल्ली : नोएडामध्ये एका हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये रिअल इस्टेट कंपनीने उभारलेले दोन 40 मजली टॉवर्स पाडण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याआधी अलाहाबाद हायकोर्टाने याच प्रकरणामध्ये दिलेला आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने देखील सुपरटेक या रिअर इस्टेट कंपनीकडून उभारण्यात आलेले हे दोन उंच टॉवर्स पाडण्याचे निर्देश दिले होते. हे दोन्हीही 40 मजली टॉवर्स नियमांचं उल्लंघन करत उभारण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळेच आता हे टॉवर्स येत्या तीन महिन्यांच्या आत पाडले जावेत, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. नोएडा प्राधिकरणाच्या देखरेखीखाली हे टॉवर्स पाडण्यासंदर्भातील सुचना कोर्टाने दिल्या आहेत.

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने निर्देश दिलेले आहेत की, या टॉवर्समधील फ्लॅट खरेदीदारांची संपूर्ण रक्कम बुकिंग केलेल्या वेळेपासून 12 टक्के व्याददरासह परत केली जावी. तसेच या टॉवर्सच्या बांधकामामुळे जो मनस्ताप झाला आहे, त्याची भरपाई म्हणून रहिवासी कल्याण संघाला दोन कोटी रुपये देण्यात यावेत, अशी सूचना कोर्टाने दिली आहे.

11 एप्रिल 2014 रोजी अलाहाबाद हाय कोर्टाने दिलेल्या आदेशाविरोधात सुपरटेक लिमिटेडने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये नोएडातील एमराल्ड कोर्ट योजनेत इमारतीच्या बांधकामामध्ये नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 40 मजली टॉवर्स पाडण्याचे निर्देश दिलेले होते. मात्र, आता सुप्रीम कोर्टाने तोच निर्णय कायम ठेवत मुदत घालून टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आता सुपरटेक कंपनीने म्हटलंय की, ते या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT