Swati Maliwal Sakal
देश

Swati Maliwal Accident : दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित; विनयभंग करत...

या घटनेुमळे राजधानी दिल्लीत महिला खरचं सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

DCW Chief Swati Maliwal News : काही दिवसांपूर्वी कारने काही अंतर एका मुलीला फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

त्या घटनेची चौकशी पूर्ण होत नाही तोचं आता दिल्लीत कारने चक्क महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांना फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेमुळे दिल्लीत नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून या घटनेला दुजोरा दिला आहे.

या घटनेत मालीवाल थोडक्यात बचावल्या असून, मालीवाल यांनी मद्यधुंद कार चालकाने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. दिल्ली एम्सच्या गेट नंबर दोनसमोर कारने मालीवाल यांना धडक दिली तसेच त्यांना १० ते १५ मीटरपर्यंत ओढत नेले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पहाटे 3.11 वाजता घडली. कार चालकाने खिडकीबंद केल्याने हात अडकला. त्यावेळी कारचालकाने साधारण १० ते १५ मीटरपर्यंत ओढत नेले.

याप्रकरणी पोलिसांनी ४७ वर्षीय कारचालक हरिश्चंद्रला अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

या प्रकरणावर स्वाती मालीवाल यांनी ट्वीट केले आले. गुरुवारी रात्री उशिरा मी दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी एका ड्रायव्हरने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला. त्याला पकडले असता त्याने माझा हात गाडीच्या खिडकीत अडकवत कारसोबत साधारण १० ते १५ मीटर फरफटत नेले.

दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला असे म्हणत त्यांनी दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच सुरक्षित नसतील तर काय परिस्थिती असेल याची कल्पना करा असे मालीवाल यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : जनगणना परिषद आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावता परिषदकडून नियोजन बैठकीचे आयोजन

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT