Farooq Abdullah 
देश

Farooq Abdullah: काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानशी बोला अन्यथा येथेही गाझा; फारुख अब्दुल्ला यांचा इशारा

अब्दुल्ला यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विधानाचा दाखला दिला. ‘आपण आपले मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही,’ असे विधान वाजपेयी यांनी केले होते.

सकाळ वृत्तसेवा

Farooq Abdullah: ‘काश्मीरच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करायला हवी,’ असे मत ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते फारुख अब्दुल्ला यांनी आज मांडले. ‘आपण या मुद्यावर चर्चा सुरू केली नाही तर आपली अवस्था देखील गाझासारखी होईल,’ असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी अब्दुल्ला यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विधानाचा दाखला दिला. ‘आपण आपले मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही,’ असे विधान वाजपेयी यांनी केले होते.

फारुख अब्दुल्ला म्हणाले, ‘‘ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता युद्ध हा पर्याय असू शकत नाही असे म्हटले आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढायला हवा. पण आता चर्चा होते तरी कोठे? नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याची शक्यता असून आता तेच स्वतः भारतासोबत चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असे सांगत आहेत पण आपण चर्चा करायला पुढाकार का घेत नाही? नेमके काय कारण आहे? आम्हाला या समस्येवर संवादाच्या माध्यमातून तोडगा काढता आला नाही तर जी अवस्था आज गाझा आणि पॅलेस्टाईनमध्ये आहे तीच येथेही निर्माण होईल.’’

त्या घटनेची चौकशी करावी-

‘‘ केवळ लष्कराच्या अधिकाऱ्यांची बदली करून निर्दोष नागरिकांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण मार्गी लागणार नाही. चौकशीदरम्यान निष्पाप लोकांचा छळ करून कशासाठी मारले जाते? याची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी म्हणून काही नागरिकांना ताब्यात घेतले होते त्यांच्या जखमांवर तिखट चोळण्यात आले. यातील तिघाजणांना छळ सहन झाला नाही आणि त्यांनी प्राण सोडले. यातील पाचजण हे सध्या रुग्णालयात आहेत. ज्या संशयिताचा मृत्यू झाला त्याचा एक भाऊ सीमा सुरक्षा दलामध्ये काम करतो आहे,’’ असे फारुख अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.

फारुख अब्दुल्ला यांचे विधान चुकीचे असून त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता पाकिस्तानसोबत चर्चेची मागणी करतो हीच बाब चुकीची आहे. केंद्रातील हे सरकार पाकिस्तानसमोर गुडघे टेकणार नाही, ही बाब त्यांनी लक्षात घ्यावी. आम्ही प्रयत्न देखील केला होता पण ते वारंवार पाठीमध्ये वार करत आहेत.


- हिना शफी भट, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT