MK Stalin - Udaynidhi 
देश

MK Stalin : लेकाच्या बचावासाठी धावले CM स्टॅलिन; म्हणाले, आपण चांद्रयान लाँच केल तरी...

रवींद्र देशमुख

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर उदयनिधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आता सीएम एमके स्टॅलिन मुलाचा बचाव करण्यासाठी समोर आले आहेत.

एमके स्टॅलिन म्हणाले की, उदयनिधी स्टॅलिन यांनी अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांशी भेदभाव करणाऱ्या सनातन तत्त्वांबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. त्यांचा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.

स्टॅलिन यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, आक्रमक तत्वांविरोधात आमची भूमिका भाजप समर्थक सहन करू शकत नाहीत. भाजपकडून खोटं पसरविण्यात आलं. ज्यामध्ये सांगण्यात आलं की, उदयनिधी यांनी सनातन विचारांच्या लोकांचा नरसंहार करण्याचं आवाहन केलं.

स्टॅलिन पुढं म्हणाले की, आपण चांद्रयान लॉन्च केलं. मात्र तरी देखील देशात काही लोक जातीवाद करत आहेत. वर्णव्यवस्थेच्या आधारावर सामाजिक भेदभाव केला जातो. तसेच धार्मिक दाव्यांचे समर्थन करण्यासाठी शास्त्र आणि धार्मिक ग्रंथांचा हवाला देण्यात येतो. काही लोक अजुनही अध्यात्मिक मंचांवर महिलांना बदनाम करतात. त्यासाठी महिलांनी काम करू नये, विधवा महिलांनी पुनर्विवाह करू नये, असा तर्क दिला जातो, असंही स्टॅलिन यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT