Tamil Nadu minister K Pondmudy was awarded three years in jail in a corruption case by The Madras High Court  
देश

तमिळनाडूच्या मंत्र्याला हाय कोर्टाने सुनावला 3 वर्षांचा तुरुंगवास; नेमकं काय आहे प्रकरण?

मद्रास हाय कोर्टाने बुधवारी तमिळनाडूतील डीएमकेचे नेते आणि स्टॅलिन सरकारमधील मंत्री के पोनमुडी यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेत ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.

कार्तिक पुजारी

चेन्नई- मद्रास हाय कोर्टाने बुधवारी तमिळनाडूतील डीएमकेचे नेते आणि स्टॅलिन सरकारमधील मंत्री के पोनमुडी यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेत ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. उत्पनाच्या स्रोताची योग्य माहिती न दिल्याबद्दल त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोनमुडी यांच्या पत्नीला देखील शिक्षा झाली आहे. (Tamil Nadu minister K Pondmudy was awarded three years in jail in a corruption case by The Madras High Court)

मंत्री आणि त्यांच्या पत्नी यांनी कोर्टात वैद्यकीय अर्ज सादर केला असून पोनमुडी हे ७३ वर्षाचे तर पत्नी ६० वर्षांची असल्याने कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली. कोर्टाने जोडप्याला तीन वर्षांचा साधा तुरुंगवास सुनावला आहे. तसेच दोघांना प्रत्येकी ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.तसेच दोषींना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करता यावी यासाठी ३० दिवसांसाठी शिक्षेला स्थगिती दिली आहे.

प्रकरण नेमकं काय आहे?

DMK च्या २००६ ते २०११ या कार्याकाळात पोनमुडी हे मंत्री होते. याकाळात त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप करत भ्रष्टाचार प्रतिंबध विभागाने २००२ मध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. २०१२ मध्ये सत्तेत आलेल्या AIADMK यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी आरोप करण्यात आला होता की, पती-पत्नीने १.४ कोटी संपत्तीचा कोणताही स्रोत सांगितलेला नाही.

वेलोरच्या स्थानिक कोर्टाने पोनुमेडी आणि त्यांच्या पत्नीला पुराव्यांअभावी २०१६ मध्ये निर्दोष ठरवलं होतं. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मद्रास हायकोर्टाने याप्रकरणात सु-मोटो दाखल करुन घेतली होती. यावर सुनावणी करताना कोर्टाने मंगळवारी पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला दोषी ठरवलं. पण, कोर्टाने अंतिम निकाल राखून ठेवला होता. आज कोर्टाने मंत्री आणि त्याच्या पत्नीला तीन वर्षाचा तुरुंगवास सुनावला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamir Khan Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; '3 इडियट्स'मधील रँचोबाबत केला मोठा खुलासा

Petrol-Diesel Price: १७ जुलैला इंधनाचे ताजे दर जाहीर! कच्चे तेल १२ टक्क्याने महागल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीला?

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Pune Crime : कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार

Tukaram Mundhe : फरक पडतो... फक्त 'तुकाराम' लागतात! FDA आयुक्त मुंढेंचा राज्यभरात धडाका; गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले, आता पुढचा नंबर कोणाचा?

SCROLL FOR NEXT