Bhupen Hazarika 
देश

आता 'भारतरत्न'चीही पुरस्कार वापसी; हजारिका कुटुंबीय नाकारणार सर्वोच्च सन्मान!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिवंगत गायक भूपेन हजारिका यांना केंद्र सरकारतर्फे प्रदान करण्यात आलेला 'भारतरत्न' पुरस्कार परत करण्याचा निर्णय हजारिका कुटुंबीयांनी घेतला आहे. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेन हजारिका यांना देण्यात आलेला सन्मान न स्वीकारण्याचा निर्णय त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पुन्हा मोठे वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 'भारतरत्न' नाकारण्याची घटना यापूर्वी घडलेली नाही.

तेज हजारिका यांनी आज (सोमवार) रात्री उशीरा एक पत्रक जाहीर करून स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. 'हजारिका यांचे नाव त्या वादग्रस्त विधेयकाशी जोडले जात आहे. या विधेयकाद्वारे आसाममध्ये आणि ईशान्य भारतामध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत हजारिका यांच्या नावाने 'भारतरत्न' जाहीर करून चुकीचा संदेश दिला जात आहे. या परिस्थितीत हजारिका यांना 'भारतरत्न' देऊन देशात शांतता नांदणार नाही आणि सुबत्ता येणार नाही', असे तेज हजारिका यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारने आसाममध्ये नागरिकत्व कायदा लागू करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. अवैधरित्या भारतामध्ये राहणार्‍या नागरिकांना येथून बाहेर काढण्यासाठी ही मोहीम असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, स्वत:चे भारतीयत्व सिद्ध करण्यासाठीच्या अटी जाचक असल्याचे काही संघटनांचे म्हणणे आहे. यावरून आसाम आणि ईशान्य भारतामध्ये राजकीय अस्वस्थता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis speech : देवेंद्र फडणवीसांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर महत्वपूर्ण भाषण, "बाबासाहेबांमुळेच जग गोल्ड स्टँडर्ड स्विकारतय"

अमरावतीत खरात पेक्षाही भयंकर कांड; 180 तरुणींचे व्हिडिओ व्हायरल, आरोपी कुटुंबासह फरार, भाजपाकडून चौकशीची मागणी

Dr. Babasaheb Ambedkar: महार रेजिमेंट! लष्करातील शौर्य, सामाजिक न्यायाच्या लढ्याचं प्रतीक; स्थापनेत आंबेडकरांचं योगदान

Pune News: इमारतींच्या पाडकामासाठी कठोर नियम; पुणे महापालिकेकडून कार्यपद्धती निश्चित, काय आहेत जाचक अटी?

Vaibhav Sooryavanshi ची भारतीय संघात एन्ट्री होणार! 'या' परदेशी दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT