Ayodhya Ram Mandir esakal
देश

Ram Mandir : २२ जानेवारीला राम येणार नाहीत, स्वतः माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं; बिहारच्या मंत्र्याचं विधान

अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी जोरदार तयारी देखल सुरू आहे

रोहित कणसे

अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी जोरदार तयारी देखल सुरू असून पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यादरम्यान राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे. यादरम्यान बिहार सरकारमधील एका मंत्र्यांने केलेलं एक विधान चर्चेत आहे

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह ते भगवान श्री कृष्ण हे आपल्या स्वप्नात आल्याचा दावा करणारे तेज प्रताप यादव यांनी आता त्यांच्या स्वप्नात प्रभू श्री राम आल्याचा दावा केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि बिहारमधील नितीश कुमार सरकारमधील मंत्री तेज प्रताप यांनी याबद्दलचा दावा केला आहे. अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात भगवान राम येणार नाहीत असे तेज प्रताप म्हणाले आहते.

२२ जानेवारीला राम येणार नाहीत, प्रभू रामाने स्वतः माझ्या स्वप्नात येऊन तस सांगितल आहे. आयेध्येत जे सुरू आहे ते ढोंग आहे असं विधान बिहार सरकार मधील मंत्री तेजप्रताप यादव यांनी केलं आहे. निवडणुका आल्या की मंदिराचा विषय येतो, निवडणुका संपल्या की मंदिराकड कोणी बघत नाही. अशा शब्दात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून तेजप्रताप यादव यांची भाजपवर टीका देखील केली आहे. दरम्यान स्वप्नात राम आल्याचा दावा केल्याने याच सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT