देश

श्रीनगर: पोलिस बसवर दहशतवादी हल्ला; तीन शहीद

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये (Shrinagar) एका पोलिस बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर चौदा जण जखमी झाले आहेत. तीन जवानांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. हा दहशतवादी हल्ला जम्मू-काश्मीरमधील झेवान भागात झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Terrorists attack)

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर टायगर्स या संघटनेनं ही जबाबदारी घेतली असून पहिल्यांदाच हे नाव समोर आलं आहे. हा ग्रुप लष्कर-ए-तय्यबाशी निगडीत असावा, अशीही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये किती अतिरेकी होते आणि कसा हल्ला करण्यात आला, याबाबत तपास सुरु आहे. सध्या सर्व जखमींना दवाखान्यात नेण्यात आलं आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

काश्मिरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

दुसरीकडे, आज काश्मिरमधील रंगरेठमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर, सुरक्षा दले आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला. शोधमोहीम सुरू केली.

यावेळी दहशतवादी व सुरक्षा दलांत चकमक झाली. या ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी दलावर बेछूट गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन अज्ञात दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी, रविवारी दक्षिण काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैशे मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT