Thalapathy Vijay latest News

 
esakal
देश

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

setback for Thalapathy Vijay : हे प्रकरण त्यांच्या चित्रपटाशी संबंधित नसून आयकर विभागाने लावलेल्या दंडाशी संबंधित आहे.

Mayur Ratnaparkhe

Thalapathy Vijay : तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थलापती विजय त्यांच्या आगामी "जन नायगन" या चित्रपटावरून बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. त्यांच्या या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळण्याचा मुद्दा प्रलंबित आहे.

२७ जानेवारी रोजी मद्रास उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला त्यांच्या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देणारा एकल न्यायाधीशांचा निर्णय रद्द केला आणि प्रकरण पुन्हा एकल खंडपीठाकडे पाठवले.  आता विजयला मद्रास उच्च न्यायालयाकडून आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांना दीड कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.  हे प्रकरण त्यांच्या चित्रपटाशी संबंधित नसून आयकर विभागाने लावलेल्या दंडाशी संबंधित आहे.

थलापती विजय यांनी आयकर विभागाच्या दीड कोटी रुपयांचा दंड भरण्याच्या आदेशाला आव्हान देणारी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, विजयने २०१५-१६ या आर्थिक वर्षात १५ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले नव्हते. दंड ठोठावल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.

विजय यांची याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती सेंथिलकुमार रामामूर्ती यांनी सांगितले की, दंड आकारण्याचा आदेश विहित मुदतीत देण्यात आला होता. त्यामुळे हस्तक्षेप करण्यास वाव देणारे काहीही नव्हते. यानंतर विजय यांच्या वकिलांनी आदेशाला आव्हान देण्यासाठी परवानगी मागितली. यावर न्यायाधीशांनी सांगितले की, याचिकाकर्त्याला अपीलीय अधिकाऱ्यांसमोर आदेशाला आव्हान देण्याचा अधिकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT