Allegation of asking questions in Lok Sabha in exchange of money Action will taken against Moitra Disciplinary Committee of Parliament meeting on Thursday sakal
देश

Cash for Query: तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रांचं लोकसभेतून निलंबन! 'कॅश फॉर क्वरी' प्रकरणं भोवलं

लोकसभेत आज याप्रकरणावर एथिक्स कमिटीचा अहवाल सादर करण्यात आला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 'कॅश फॉर क्वरी' प्रकरणात त्यांच्यावर विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली. आज लोकसभेत याप्रकरणावर एथिक्स कमिटीचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. (TMC MP Mahua Moitra expelled from the Lok Sabha in cash for query matter)

या प्रकरणावर बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांचा प्रस्ताव सभागृहात मतदानासाठी ठेवला. खासदार निशिकांत दुबे यांनी खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती की, त्यांनी सभागृहात प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतले होते. हे प्रकरण तपासण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी एथिक्स कमिटीकडं देण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

या कमिटीचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. हा अहवाल स्विकारण्यात आला आहे. त्यानुसार, महुआ मोइत्रा यांचं वागणं हे अनैतिक आणि खासदार म्हणून अशोभनिय आहे. त्यामुळं त्यांनी लोकसभा सदस्यत्वपदी राहणं योग्य राहणार नाही. यासाठी त्यांचं लोकसभा सदस्यत्व निलंबित करण्यात यावं. यानंतर यावर मतदान घेतलं गेलं. यानंतर हा प्रस्ताव लोकसभेत मंजुर करण्यात आला आणि महुआ मोइत्रा यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, महुआ मोइत्रांवर निलंबनाच्या कारवाईनंतर सभागृहाचं कामकाज ११ डिसेंबर २०२३ पर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यामुळं सभागृहाचं कामकाज आता सोमवारी, ११ डिसेंबर रोजी पुन्हा सुरु होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT