TMC Yashwant Sinha esakal
देश

विरोधी पक्ष यशवंत सिन्हांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देणार?

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधक आपल्या उमेदवाराबाबत सतत विचारमंथन करत आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) विरोधक आपल्या उमेदवाराबाबत सतत विचारमंथन करत आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही विरोधी पक्षांची बैठक बोलावली असून, त्यात आगामी राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा होणार आहे. आज विरोधक राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा करू शकतात, असं मानलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरोधक वेगवेगळ्या नावांवर चर्चा करत आहेत. यापूर्वी फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांचं नाव पुढं येत होतं. मात्र, फारुख अब्दुल्ला यांनी ते स्वीकारण्यास नकार दिलाय. फारुख अब्दुल्ला यांच्याशिवाय शरद पवार आणि गोपाळकृष्ण गांधी (Gopalkrishna Gandhi) यांच्या नावाचीही विरोधी पक्षात चर्चा झालीय. मात्र, आता विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून नवा चेहरा समोर येत आहे. या अहवालावर विश्वास ठेवला, तर विरोधक यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून उभं करू शकतात.

खुद्द यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी ट्विट करून याकडं लक्ष वेधलंय. यशवंत सिन्हा यांनी ट्विट करून लिहिलंय की, 'तृणमूल काँग्रेसमध्ये मला सन्मान आणि प्रतिष्ठा दिल्याबद्दल मी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा आभारी आहे. आता माझ्यावर पक्षापासून फारकत घेऊन मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी, विरोधी ऐक्यासाठी काम करण्याची वेळ आलीय. मला खात्री आहे की, ममता बॅनर्जी माझं हे धोरण स्वीकारतील.'

रिपोर्टनुसार, माजी केंद्रीय मंत्री आणि टीएमसीचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांना विरोधी पक्ष राष्ट्रपती पदाचा उमेदवार बनवू शकतात. एका वृत्त वाहिनीच्या बातमीनुसार, खुद्द टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्यानं याबाबत माहिती दिलीय. यशवंत सिन्हा गेल्या वर्षीच टीएमसीमध्ये सामील झाले होते. TMC नेत्यानं सांगितलं की, यशवंत सिन्हा यांचं नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून काही विरोधी पक्षांनी पुढं केलं होतं, ज्याला 3-4 पक्षांनीही पाठिंबा दिला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही यशवंत सिन्हा यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं कळतंय. त्यामुळं विरोधी पक्षांना आता तरी उमेदवार मिळणार का? याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT