airport 
देश

दोन्ही डोस घेतलेल्यांना RT-PCR चे बंधन नको; राज्यांना सूचना

कार्तिक पुजारी

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्रासह अनेक राज्यांनी निर्बंधात शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. पर्यटन मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत

नवी दिल्ली- देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्रासह अनेक राज्यांनी निर्बंधात शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. पर्यटन मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देशांतर्गत प्रवास करताना RT-PCR चाचणी बंधनकारक करु नये, असं मंत्रालयाकडून राज्यांना सांगण्यात आलं आहे. मंत्रालयाने बुधवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिलं असून देशभरात एकच प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने पर्यटन मंत्रालयाचे अॅडिशनल डायरेक्टर जनरल रुपींदर ब्रार यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. (National Latest News)

काही राज्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना RT-PCR चाचणीशिवाय राज्यात प्रवेश करु देत आहेत. पण, काही राज्यांनी प्रवाशांनी दोन्ही डोस घेतले असले तरी RT-PCR रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले आहे. पश्चिम बंगालने मुंबई, पुणे, चेन्नई, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना दोन्ही लस घेतल्या असल्या तरी RT-PCR चा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्यास सांगितलं आहे. ब्रार म्हणाले की मंत्रालय सर्व राज्यांना एकच प्रोटोकॉलचे अनुकरण करण्यासाठी सांगत आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्यास बांधिल करु नये, असं सूचवलं आहे. पर्यटन आणि सेवा क्षेत्राशी संबंधित संघटनांशी मंत्रालयाने 5 ऑगस्ट रोजी बैठक घेतली होती. यावेळी नियम शिथिल करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येतंय.

महाराष्ट्र आणि सिक्किम सारख्या राज्यांनी देशभरातून येणाऱ्या प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्याची मुभा दिली आहे. त्यांनी यावेळी RT-PCR रिपोर्ट दाखवणे बंधनकारक नाही, पण त्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी एकच प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. ब्रार म्हणाले की, आरोग्य आणि नागरी उड्डाण मंत्रालयासोबत यासंदर्भात बैठक बोलावली जाणार असून एकत्र प्रोटोकॉल कसा राबवला जाईल याबाबत चर्चा केली जाणार आहे. प्रवाशांना अधिक सवलत देण्याचा मंत्रालयचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT