Twitter 
देश

जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार

पीटीआय

नवी दिल्ली - सायबर हल्लेखोरांनी ट्विटर कंपनीच्याच काही निवडक कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्या गोपनीय माहितीचा वापर केला, असा दावा या कंपनीने केला. जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार झाल्याने खळबळ माजली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सायबर हल्लेखोरांनी बराक ओबामा, बिल गेट्स, एलॉन मस्क, जेफ बेझोस अशा दिग्गज लोकांचे ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावरून खोट्या पोस्ट केल्या होत्या. त्यात बिटकॉईनची गुंतवणूक करून तिप्पट परतावा देण्याचे आश्वासन होते. या बड्या नावांवर विश्वास ठेवून अनेकांनी बिटकॉईन गुंतवले आणि ते फसले. यानंतर ट्विटर कंपनीने हल्ल्याचे विश्लेषण करत एक निवेदन आज प्रसिद्ध केले आहे.  काही कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून हा हल्ला झाल्याचे कंपनीने सांगितले असले तरी अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने माहिती जाहीर केलेली नाही. 

असा केला हल्ला

  • सोशल इंजिनिअरिंगच्या एका योजनेद्वारे काही कर्मचाऱ्यांवर जाळे
  • त्यांच्याकडील गोपनीय माहितीचा वापर
  • त्याद्वारे १३० प्रभावशाली व्यक्तींचे ट्विटर अकाउंट हॅक केले
  • काही अकाउंटचे पासवर्ड बदलून त्याद्वारेही बनावट पोस्ट

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Audio Clip: ''तो तुम्हाला गिळून टाकेल..'' जरांगेंनी 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडला; ग्रुप बैठकीची धक्कादायक क्लिप...

Raj Thackeray: मोदी-अदाणी मैत्री! राज ठाकरेंनी थेट डॉक्युमेंट्रीच शेअर केली, पाहा video

RBI Repo Rate: महागाईमुळे व्याजदर वाढवले! लोन आणि EMI आणखी महागणार? RBI गव्हर्नरांचे मोठे संकेत

Latest Marathi News Live Update : मराठा समाजाला न्याय देण्यात एकनाथ शिंदे यांचेही योगदान- रामदास कदम

IND vs NZ 1st T20I: भारताने टॉस जिंकला, चक्रावणारा निर्णय घेतला! भुवनेश्वर कुमारचे चार वर्षांनी पुनरागमन, Playing XI मध्ये दोन बदल

SCROLL FOR NEXT