Crime News 
देश

Crime News : खासगी रुग्णालयात एसीमुळे गारठून दोन नवजात बालकांचा मृत्यू; डॉक्टरला अटक

रवींद्र देशमुख

मुझफ्फरनगर (यूपी): उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरला लागून असलेल्या शामली जिल्ह्यातील कैराना भागात एका खाजगी दवाखान्यात दाखल असलेल्या दोन नवजात बालकांचा रविवारी एअर कंडिशनरच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी माहिती दिली.

कैराना पोलिस स्टेशनचे प्रभारी नेत्रपाल सिंह यांनी सांगितले की, मृत मुलांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे डॉ. नीतू यांच्या विरोधात अनावधानाने झालेल्या हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्वनी शर्मा यांनी रविवारी दिली.

या संदर्भात पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बसेरा गावातील रहिवासी नाझीम आणि कैराना येथील साकिब यांच्या दोन नवजात बालकांना शनिवारी स्थानिक खासगी दवाखान्यातील फोटोथेरपी युनिटमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT