Crime News esakal
देश

भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप; गुन्हा दाखल

नामदेव कुंभार

नैसर्गिक भूकंपांसाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये राजकीय अस्थिरतेच्या भूकंप झाला आहे. जेमतेम चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदावर नियुक्त झालेले आणि वादग्रस्त ठरलेले तीरथसिंह रावत यांनी शुक्रावारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे उत्तराखंडमध्ये राजकीय भूकंप आला असतानाच एका आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पक्षातील सहकारी महिलेनेच या आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हरिद्वारजवळील ज्वालापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार सुरेश राठौर यांच्या विरोधात पोलिस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पक्षातील कार्यकर्त्या महिलेने राठौर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. मागील काही दिवसांपूर्वी सुरेश राठौर यांनी याच महिला नेत्याच्या पतीविरोधात 30 लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती.

बलाक्ताराच्या आरोपानंतर पोलिसांनी सुरेश राठौर यांच्याविरोधात भा.द.वि 156(3), 376, 504, 506 गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत असल्याची माहिती हरिद्वारचे वरिष्ठ पोलिस आधिकारी अबुदई कृष्णराज यांनी दिली आहे. आमदार सुरेश राठौर यांनी आपल्यावरील सर्व आरोपाचं खंडण केलं आहे. तसेच माझ्या जिवाला धोका असल्याचेही सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

Vijay Thalapathy CM Tamil Nadu : विजय थलपतींचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा? शपथविधीची तयारी सुरू; राहुल गाधींना पाठींब्याचे पत्र, काँग्रेसनेही 'विजय'सोबत मिळवला हात

Pune News: ‘एमपीएससी’ भरतीला अचानक स्थगिती; सरकारी अभियोक्ता पदांवर वकिलांचा संताप, राजकीय हस्तक्षेपाचा आरोप..

Latest Marathi News Live Update : काळाराम मंदिरात आज 'धर्मध्वज' सोहळा; माजी राष्ट्रपती कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

SCROLL FOR NEXT