amit shah esakal
देश

आपत्तीला सामोरं जाण्यासाठी जनतेला तयार करण्याची गरज - अमित शहा

सकाळ डिजिटल टीम

२५ राज्यातील ३० पूरग्रस्त जिल्ह्यात प्रायोगित तत्वावर आपत्ती मित्र ही योजना सुरु करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्थापनेला १७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मोठी घोषणा केली आहे. २५ राज्यातील ३० पूरग्रस्त जिल्ह्यात प्रायोगित तत्वावर आपत्ती मित्र ही योजना सुरु करण्यात आली आहे.

आपत्ती मित्र योजनेत ५ हजार ५०० आपत्ती मित्र आणि मैत्रिणींचा समावेश आहे. आता ही योजना ३५० आपत्तीग्रस्त जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

अमित शहा म्हणाले की, काही सेकंदात आपत्तीत काम सुरु करावं लागतं. हे काम जनताच करु शकते. गावागावात आपत्ती मित्रच हे करू शकतील. आपत्ती मित्र ही संकल्पना खूप चांगली आहे. आपत्तीला सामोरं जाण्यासाठी जनतेला तयार करण्याची गरज असल्याचंही अमित शहा यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग भारतात आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करते. यंदा स्थापना दिनाचा विषय हा हिमालयातील आपत्तीच्या घटनांचा होणारा परिणाम आहे. या कार्यक्रमात हिमालयातील भूस्खलन, ढगफुटी, भूकंप, ग्लेशिअर वितळून येणाऱ्या आपत्ती इत्यादींवर सविस्तर चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT