PM_Narendra-Modi. 
देश

पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रसंघाला करणार संबोधित; 17 जुलैला भाषण

कृपादान आवळे

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाला रोखता यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 जुलैला संयुक्त राष्ट्र संघात (UN) संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून हा कार्यक्रम होत आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मोदी भाषण करणार आहेत. 

पंतप्रधान मोदी हे भारताच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या विजयानंतर संयुक्त राष्ट्रमध्ये पहिल्यांदाच भाषण करणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या स्थायी प्रतिनिधी टीएम तिरुमूर्ती यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 17 जुलैला न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रच्या ECOSOC उच्च स्तरीय व्हॅलिडिक्टरीमध्ये भाषण करणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरक्षा परिषदेत भारताला दोन वर्षांसाठी अस्थायी सदस्यता मिळाली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी दिलेल्या समर्थनासाठी आभार व्यक्त केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत वैश्विक शांती, सुरक्षेसह विविध मुद्द्यांवर सदस्य देशांच्या मिळून काम करणार आहे. 

पंतप्रधान मोदींनी मागील वर्षी केले होते संबोधित

पंतप्रधान मोदींनी मागील वर्षी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत सप्टेंबर महिन्यात संबोधित केले होते. तेव्हा त्यांनी पूर्ण जगात दहशतवादाच्या विरोधात एकजूट होण्यासाठी आवाहन केले होते. 

17 जूनला झाली होती निवडणूक

17 जूनला भारताला  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या अस्थायी सदस्य म्हणून बिनविरोध निवडण्यात आले होते. 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेने 75 व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य आणि आर्थिक व सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक घेतली होती. त्यामध्ये भारताला 192 पैकी 184 मत प्राप्त झाली होती. 

2021-22 पर्यंत अस्थायी सदस्य बनेल भारत

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 5 स्थायी आणि 10 गैर-स्थायी सदस्य आहे. स्थायी सदस्यांमध्ये चीन, फ्रान्स, रुस, यूके आणि यूएसचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी यूएनएससीच्या महासभा दोन वर्षांच्या कार्यकाळात पाच गैर-स्थायी सदस्यांची निवड करत आहे. त्याअंतर्गत 2021-22 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वोच्च संस्थेचे अस्थायी सदस्य बनला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT