ed esakal
देश

तुरुंगात असलेल्या ३ नेत्यांच्या चौकशीसाठी ईडीला परवानगी

सकाळ डिजिटल टीम

वेगवेगळ्या तुरुंगामध्ये असलेल्या तीन नेत्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या तुरुंगामध्ये असलेल्या तीन नेत्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सपा नेते आजम खान, गँगस्टर ते आमदार असा प्रवास केलेले मुख्तार अन्सारी आणि अतिक अहमद यांच्याविरोधात चौकशीसाठी ईडीला परवानगी मिळाली आहे. आता ईडी या तिघांची मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी करणार आहे.

सक्तवसुली संचालनालयाने तीन नेत्यांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने न्यायालयात या तिन्ही नेत्यांना ताब्यात देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ईडीची मागणी मान्य केली असून लवकरच ईडी या तिघांची चौकशी करेल.

समाजवादी पक्षाचे नेत आझम खान यांच्यावर शेतकऱ्यांची जमिन हडपल्याचा आरोप आहे. त्याची तक्रार शेतकऱ्यांनी राज्यपालांकडे केली होती. जौहर युनिव्हर्सिटीच्या नावाखाली जमिन घेताना त्यांनी सरकारी पैशांचा वापर केला. दुसरीकडे युपीतील बांदा तुरुंगात असलेले आमदार मुख्तार अन्सारी यांच्याविरोधात ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनी अवैधरित्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. तर अतिक अहमद यांच्यावरही बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 1st ODI: पावसाचा खोडा... भारत-अफगाणिस्तान मॅच केव्हा सुरू होणार? BCCI ने दिले अपडेट्स; सामना रद्द होणार?

Navi Mumbai Electricity: अंधारात बुडालं खारघर, हजारो कुटुंबाचे हाल; अचानक वीज गेल्यानं लिफ्टमध्ये अडकले तरुण तरुणी

Latest Marathi News Live Update : पक्ष काँग्रेसमध्ये विलनी करण्याऐवजी भाजपा सोबत या, रामदास आठवलेंचा राष्ट्रवादीला प्रस्ताव

Sangli Rain Update : घाईघाईत पेरणी करताय? सांगली कृषी विभागाचा शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला; 'एवढा' पाऊस झाल्याशिवाय पाऊल उचलू नका!

ऑपरेशन टायगर! महाराष्ट्रात राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे गटाच्या ७ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गुप्त बैठक?

SCROLL FOR NEXT